Category: लघुकथा

  • कथुली – म्हणजे कथेचं पिल्लू – मोठा डोस देणाऱ्या छोट्या कथा

    कथुली – म्हणजे कथेचं पिल्लू – मोठा डोस देणाऱ्या छोट्या कथा

    काही वर्षांपूर्वी, ‘सेकंड हॅन्ड’ नावाची, दोन भावांची एक कथा वाचलेली. त्यांचे वडील कुठल्या तरी कापड दुकानात दिवाणजी होते. तशी परिस्थिती बेताचीच होती. पण दोघं मुलं छान शिकली. त्यातला मोठा भाऊ खूप हुशार, पहिला नंबरवाला होता. छोटा तसा हुशारच पण मोठ्याच्या सावलीत झाकोळलेला. छोटा भाऊ मेहनती होता, पण फार महत्वाकांक्षी नव्हता. त्याचा टारगेट ठेवून पुढं जायचा…

  • चल बस, एक राऊंड मारून येऊ – सुहास मळेकर

    चल बस, एक राऊंड मारून येऊ – सुहास मळेकर

    ‘चल बस, एक राऊंड मारून येऊ’, म्हणत लेखक सुहास मळेकर आपलीला अशा जगात नेतात, जे जग आपल्या  आजूबाजूलाच आहे पण उघड्या डोळ्यांनी कधी आपण त्याकडे पहिलं नाही किंवा पाहण्याची तसदी घेतली नाही. अनेक साप्ताहिक, मासिकं व वृत्तपत्रातून ‘फोटो जर्नलिस्ट’ म्हणून काम करताना लेखक सुहास मळेकर यांना हे जग कधी कॅमेऱ्याच्या लेन्समधून दिसलं तर कधी लेन्सबाहेरून.…

  • ‘माणदेशी माणसां’ची अस्सल मराठी शब्दचित्रं

    ‘माणदेशी माणसां’ची अस्सल मराठी शब्दचित्रं

    माणदेशी माणसं हा व्यंकटेश माडगूळकरांचा सर्वात पहिला कथासंग्रह. माणदेशातल्या साध्या, सरळ आणि कष्टकरी माणसांची ही शब्दचित्र इतकी हुबेहूब आणि सुंदररित्या रंगवली आहेत, की वाचताना ती आपल्यासमोर उभी राहतात. अगदी आजही. मला आवडलेला ‘झेल्या’ बघा. ‘बटन नसलेल्या कुडत्याला एक हातानं गळ्याशी धरून झेल्या बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगानं किरकोळच. वयानंही फारसा नसावा. तेरा-चौदा एवढा. डोक्याला मळकट…

  • सरल तरल

    सरल तरल

    हे पुस्तक वाचण्याची एकच अट आहे. – ती म्हणजे वास्तवाने जखडलेले मन मोकळं करायचं, असं कधी असतं का? हा विचार जरावेळ बाजूला ठेवायचा आणि मग वाचायला घ्यायचं. एखादा डांबरी रस्ता हा मुळात एखादी कच्ची मातीची  पायवाट असतो. आता विचार करा की, एखादी मळकी, कच्ची, धुळीनं भरलेली मातीची पायवाट ही आत्ताच्या एखाद्या नवीन डांबरी रस्त्याची आई…

  • वाईज अँड अदरवाईज

    वाईज अँड अदरवाईज

    सुधा मूर्तींनी, एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, की माझी पुस्तकं वाचताना, लोकांना डिक्शनरी घेऊन बसावं लागू नये असं मला वाटतं; मग ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना माझे अनुभव आरामात वाचता यायला हवेत. आणि तेव्हा मला जाणवलं की खरंच, जेव्हा मी इंग्रजी पुस्तकांकडे वळले तेव्हा सुधा मूर्तींच्या सोप्प्या, सुंदर आणि ओघवत्या लिखाणशैली मुळेच त्यांच्या पुस्तकांनी मला…