Category: कथासंग्रह

  • कथुली – म्हणजे कथेचं पिल्लू – मोठा डोस देणाऱ्या छोट्या कथा

    कथुली – म्हणजे कथेचं पिल्लू – मोठा डोस देणाऱ्या छोट्या कथा

    काही वर्षांपूर्वी, ‘सेकंड हॅन्ड’ नावाची, दोन भावांची एक कथा वाचलेली. त्यांचे वडील कुठल्या तरी कापड दुकानात दिवाणजी होते. तशी परिस्थिती बेताचीच होती. पण दोघं मुलं छान शिकली. त्यातला मोठा भाऊ खूप हुशार, पहिला नंबरवाला होता. छोटा तसा हुशारच पण मोठ्याच्या सावलीत झाकोळलेला. छोटा भाऊ मेहनती होता, पण फार महत्वाकांक्षी नव्हता. त्याचा टारगेट ठेवून पुढं जायचा…

  • मराठी रहस्य कथा-हाकामारी-हृषीकेश गुप्ते

    मराठी रहस्य कथा-हाकामारी-हृषीकेश गुप्ते

    रहस्यकथा वाचताना एकतर आधीच आपण त्यात एकदम गुंतून गेलेलो असतो.  पुढे काय? पुढे काय होणार? ही उत्सुकता कायम मनावर असते, अशावेळी जर लेखकाने आपल्याला अशा एखाद्या वळणावर आणून सोडलं की जिथून आत्ता तुम्हालाच शोध पूर्ण करायचा आहे तर? मग पुढचे चार-पाच दिवस किंवा त्याहूनही जास्त ते कोडं सोडवण्यातच किंवा फक्त त्याचा विचार करण्यातच जातात. हृषीकेश…

  • चल बस, एक राऊंड मारून येऊ – सुहास मळेकर

    चल बस, एक राऊंड मारून येऊ – सुहास मळेकर

    ‘चल बस, एक राऊंड मारून येऊ’, म्हणत लेखक सुहास मळेकर आपलीला अशा जगात नेतात, जे जग आपल्या  आजूबाजूलाच आहे पण उघड्या डोळ्यांनी कधी आपण त्याकडे पहिलं नाही किंवा पाहण्याची तसदी घेतली नाही. अनेक साप्ताहिक, मासिकं व वृत्तपत्रातून ‘फोटो जर्नलिस्ट’ म्हणून काम करताना लेखक सुहास मळेकर यांना हे जग कधी कॅमेऱ्याच्या लेन्समधून दिसलं तर कधी लेन्सबाहेरून.…

  • बॉडीगार्ड – सत्य कथेवर आधारित बाबा कदमांची गाजलेली कादंबरी

    बॉडीगार्ड – सत्य कथेवर आधारित बाबा कदमांची गाजलेली कादंबरी

    बाबा कदम यांनी लिहिलेली बॉडीगार्ड ही रहस्यमय कादंबरी सत्य घटनेवर आधारित आहे. बाबा कदम हे वकील होते आणि पोलिसांसोबत काम करत होते. सरकारी वकील म्हणून काम करताना त्यांना अशा अनेक केसेस व घटनांना सामोरं जावं लागायचं ज्यातून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिसायचे. या केसेस मधून मिळालेले अनुभव बाबा कदमांनी आपल्या खास शैलीत शब्दबद्ध केले आणि…

  • बालमनावर चांगले संस्कार करणारी – ‘श्यामची आई’

    बालमनावर चांगले संस्कार करणारी – ‘श्यामची आई’

    आता नाव आठवत नाहीये, पण मी शाळेत असताना एकदा पेपरमध्ये बातमी वाचलेली की, कोणीतरी एक वृद्ध गृहस्थ शाळा-शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ पुस्तकाचे मोफत वाटप करत आहेत. मुलांमध्ये मूल्यसंस्कार रुजावेत म्हणून. असे उपक्रम इतरही अनेकजण आजही नक्कीच करत असतील. इतकं भारी वाटलेलं ती बातमी वाचून. तेव्हापासून आम्ही देखील सर्वांना वाढदिवसाला किंवा सणानिमित्त ‘श्यामची…

  • दहाजणी – संदर्भ बदलले पण प्रवृत्ती नाही

    दहाजणी – संदर्भ बदलले पण प्रवृत्ती नाही

    “चूक तुझी नाहीये, गोपाळा -” मी जरा सौम्यपणे म्हटलं. “चूक तुझ्या नस्त्या वेडगळ नीतिकल्पनांची आहे त्या कल्पनांनी तू स्वतःला जखडून घेतलयस, म्हणून हातपाय हलवू शकत नाहीयेस! मुलगी आपली आहे! तिचा छळ होता, सासरी पटत नाही, तर मग तिला घरी परत आणली पुढं तिची काही प्रगती होईल, असं पाहिलं- हे सगळ शहाणपणाला धरून आहे की नाही?…

  • यक्षांची देणगी – विज्ञानकथांचा खजिना

    यक्षांची देणगी – विज्ञानकथांचा खजिना

    डॉ. जयंत नारळीकरांचं ‘यक्षांची देणगी’ हे एक एव्हरग्रीन पुस्तक आहे. तुम्ही आधी कितीही वेळा ते वाचलं असेल, तरी एकदा हातात घेतलं की पुन्हा पुन्हा वाचावं वाटेल असा या पुस्तकाचा चार्म आहे. सातवीत असताना पहिल्यांदा ‘यक्षांची देणगी’ हे पुस्तक वाचलेलं आणि तो अनुभव मी आजही विसरू शकत नाही. मराठीत वाचलेलं हे माझं पहिलंच विज्ञानकथांच पुस्तक होतं…

  • ‘माणदेशी माणसां’ची अस्सल मराठी शब्दचित्रं

    ‘माणदेशी माणसां’ची अस्सल मराठी शब्दचित्रं

    माणदेशी माणसं हा व्यंकटेश माडगूळकरांचा सर्वात पहिला कथासंग्रह. माणदेशातल्या साध्या, सरळ आणि कष्टकरी माणसांची ही शब्दचित्र इतकी हुबेहूब आणि सुंदररित्या रंगवली आहेत, की वाचताना ती आपल्यासमोर उभी राहतात. अगदी आजही. मला आवडलेला ‘झेल्या’ बघा. ‘बटन नसलेल्या कुडत्याला एक हातानं गळ्याशी धरून झेल्या बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगानं किरकोळच. वयानंही फारसा नसावा. तेरा-चौदा एवढा. डोक्याला मळकट…

  • द प्रॉफेट – आयुष्याची वाट सोपी करण्यासाठी

    द प्रॉफेट – आयुष्याची वाट सोपी करण्यासाठी

    माणूस जीवनाचा शोध घेण्यासाठी सतत धडपडत असतो. परंतु त्याला माहीत नसतं, की ज्या जीवनाचा तो शोध घेण्याचा प्रयत्न करतो ते जीवन त्याच्यातच असते. – खलील जिब्रान, द प्रॉफेट. खलील जिब्रान या जगप्रसिद्ध लेबनॉनी-अमेरिकन लेखक आणि कवीचे ‘द प्रॉफेट’ हे एक छोटंसं पण आयुष्याचं तत्वज्ञान तरल काव्यात्मक रुपात मांडणार अतिशय सुंदर पुस्तक. या पुस्तकाचं जगभरात २०…

  • सरल तरल

    सरल तरल

    हे पुस्तक वाचण्याची एकच अट आहे. – ती म्हणजे वास्तवाने जखडलेले मन मोकळं करायचं, असं कधी असतं का? हा विचार जरावेळ बाजूला ठेवायचा आणि मग वाचायला घ्यायचं. एखादा डांबरी रस्ता हा मुळात एखादी कच्ची मातीची  पायवाट असतो. आता विचार करा की, एखादी मळकी, कच्ची, धुळीनं भरलेली मातीची पायवाट ही आत्ताच्या एखाद्या नवीन डांबरी रस्त्याची आई…