भंडारदरा लेक – कॅम्पिंग

तुम्ही Artist असल्याचा हा एक एकदम भारी फायदा आहे. लोकं तुम्हाला मजा करायचं ‘काम’ देतात. 🙂 . हो.. हा असा Artistic New Year Plan माझा कधीचाच रेडी होता. Mumbai Travellers च्या ‘भंडारदरा लेक कॅम्पिंग’ला मला गिटारिस्ट म्हणून निवडण्यात आलं होतं. पाण्याचा शांत आवाज ऐकत, कॅम्प-फायर मधल्या आगीचा एकसारखा चालेला बीटलेस डान्स न्याहारत बॉलीवूड सॉंन्ग्स वाजवायचं कष्टाचं काम मी या New Year ला करणार होतो 😛 .

Day 1 (31st Dec 2016) –

दादर वरून सोना, मोना, मीना, सोनिया अशी मजेशीर नावाची लिस्ट चेक करत करत लोकं बसमध्ये चढवली आणि मग ठाणे-तीनहात नाक्याचा शेवटचा पिकअप घेऊन गाडी भंडारदराच्या रस्त्याने निघाली. अंताक्षरी, सेवन-अप असे खेळ, मध्ये रस्त्यात थोडा लंच, कसारा घाटात लागलेले नयनरम्य डोंगर आणि त्यातून सगळ्यात उंचावर दिसणार ‘कळसुबाई’ शिखर, आणि नंतर सर्वात शेवटी त्या भल्या मोठ्या तलावातल्या पाण्याला अखंडपणे सावरून धरणार ते शंभर वर्षाहून जुनं इंग्रजकालीन धरण. ५-६ तास अस्से काही मिनिटांसारखे निघून गेले.

कोकम सरबत आणि गरमागरम भजी खाऊन आम्ही बोटीने एका शांत जागी गेलो. जिथे कनिका, केदार आणि वैभव ह्या Mumbai Travellers च्या लीड्सनी आधीच कॅम्पसाईट सेट करून ठेवलेली. आज Mumbai Travellers चा पाचवा वाढदिवस होता, मग लोकांच्या आनंदात काही कमी पडेल याचा सुईच्या टोका एवढा डाउट सुद्धा माझ्या मनात आला नाही.

मनातल्या मनात चालू असलेली ‘मला वाटते बसूनी विमानी आकाशगंगी हिंडावे किंवा सुंदर नौके मधुनी.. ‘ हि लहानपणी पुस्तकात वाचलेली कविता आठवत आम्ही कॅम्पसाईटवर उतरलो. बर झालं शाळेत आमच्याकडून कविता पाठ करून घेतल्या जायच्या! नाय तर अशा वेळी मनात कोणते विचार आणायचे याचा विचार करण्यातच वेळ गेला असता!

कॅम्पिंगमध्ये रंग भरण्यासाठी दोन टीम्स बनवून त्यांच्यात जेवण बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचा ‘Justifed’ निकाल देण्यासाठी परेलच्या सुप्रसिद्ध कूक ‘शेफ संकेतला’ बोलवण्यात आलं होतं. भाजी बनवणारी ‘भाजीगर’ टीम आणि भात बनवणारी ‘नाव नसलेली’ टीम अंधारात तेल-मीठ, लाकूड, चाकू, आणि देव जाणे अजून काय काय शोधात फिरत होती. एका लोकल दादाने खांब्यावर आकडा टाकून माझा Amplifier जोडून दिला आणि माईक टेस्टिंग करून मी माझ्या कामाला लागलो. बॉलीवूड मेहेफील चांगली दिड तास रंगली, ‘शेफ संकेत’ आमच्यासाठी बार्बिक्यूवर बाजूलाच वेज-नॉनवेज आयटम्स तयार करत होताच. स्टार्टर संपले कि जेवण आणि ५ वर्ष पूर्ण झाल्याबद्धल आणलेला मोठा केक, मग १२ च्या ठोक्याआधी सगळ्यांसाठी सरप्राईज ‘वाईन शोट्स’, सगळ अगदी ठरल्यासारखं झालं.

लोकांना वाटण्यासाठी हातात धरलेली बॉटल नवीन वर्षाच्या पहिल्या मिनिटाला तशीच हातात राहिली आणि ह्या वर्षाची सुरुवात थोडी बेधुंदच झाली. पण बेधुंदी त्या आमली द्रव्याच्या प्रभावाची नव्हती, तर मला लागलेल्या माझ्या मित्रांच्या सवयीची होती. कॉलेजनंतर आतापर्यंतच प्रत्येक New Year मी त्यांच्या सोबतच सुरु केलं. पण हे.. हे नवीन वर्ष फक्त त्यांच्या आठवणीनेच. नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येकाने lantern आकाशात सोडून नवीन वर्षाच्या नवीन इच्छा मागितल्या, आणि मी मात्र त्याच जुन्या इच्छेवर अडकून होतो.

Day 2 : 1st day of 2017 –

रात्री शेकोटीभोवती बसून केलेल्या गप्पा सकाळी ५ वाजता संपल्या, लांब गावात कुठे तरी कोंबडा आरवला आणि आम्ही झोपायला आपापल्या टेंट मध्ये गेलो. शेकोटी सोडून लांब आल्यावर तिथल्या थंडीची जाणीव झाली. एवढंसं लाकूड ते, पण आजूबाजूला कितीही थंडी असली तरी तिला विसरायला लावण्याची ताकद असते बाकी त्यात.

सकाळी कितीला उठलो माहित नाही, बर किती वाजले बघायला वेळही नव्हता. तलावात दनादन उड्या मारणाऱ्यांचा आवाज येत होता. डोळे चोळले, जरा भानावर आलो आणि थेट बिचाण्यातून उठून आमच्या ‘उडी स्पॉट’ला जाऊन – धडाम – उडी मारली! तास दिड तास पोहलो, उड्या मारल्या, कार्तिकच्या गो-प्रो मध्ये त्याचे भन्नाट विडीयो केले (@कार्तिक – मित्रा Thanks For the गो-प्रो) आणि मग चहा-पोहे खाऊन रिटर्न जर्नीला रवाना झालो.

ह्या वर्षी माझे जुने मित्र माझ्यासोबत नव्हते, पण नंतर कधी तरी त्यांच्या सोबत इथे नक्की येईन असे प्लान्स करत मी ह्या नवीन वर्षाच्या नवीन मित्रांसोबत ती जागा सोडली. ह्या कॅम्पिंगला मी आलो नसतो तर मला अर्पिता सारखी उत्तम म्युसिक प्रोड्युसर भेटली नसती जी सध्या A.R. Rehman साठी काम करते, अंकित आणि सची सारखे गोंडस भाऊ-बहिण पाहायला मिळाले नसते, आणि बाकी ते सगळे ‘कॅम्पिंग वेडे’ ज्यांच्यामुळे हि कॅम्पिंग अविस्मरणीय झाली.

बाय बाय २०१६.. Let’s See २०१७ मध्ये Mumbai Travellers सोबत अजून कुठे कुठे फिरायला मिळतंय!

Related Posts

  • Reply Your Fan January 7, 2017 at 8:17 pm

    Are wah.. Mumbai travellers sobat next New year plan pakka.. ani I hope ki tu music aani guitar etc chi kalaji ghyayala asashilach tithe? right?

  • Leave a Reply