मी गिटार वाजवतो कारण…

गिटार वाजवायला शिकण्याचे खूप फायदे आहेत, इथे सगळेच्या सगळे सांगणं तसं अवघड आहे, पण मी कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त फायदे सांगण्याचा प्रयत्न करीन. 🙂

मानसिक फायदे

म्युजिशिअनच्या मेंदूला त्यांनी निर्माण केलेल्या म्युजिकचा फायदा नक्कीच होत असतो. म्युजिक बनवण्याची प्रोसेस मनाला हलकं करणारी असते. Basically, तुम्ही जेव्हा एखादा म्युजिक पीस वाजवता तेव्हा तुम्ही हात आणि मेंदू ह्यांच्या को-ऑरडीनेशनने ते करत असता. ह्यात तुमची बुद्धी तल्लक होत असतेच, शिवाय सोबत तुम्ही मेंदूला असं काही तरी करण्यास प्रवृत्त करत असता ज्यामुळे तो एका वेगळ्याच दृष्टीने वाढत असतो. व्यायामशाळेत जसं तुमच्या स्नायूंची ताकद वाढते, तसंच काहीस तुम्ही गिटार वाजवताना मेंदूच्या बाबतीत होत असतं.

ह्यात नेहमीच काहीतरी नवीन शिकण्यासारख आहे, मग ती नवीन कॉर्ड असो, किंवा स्केल, किंवा एखादं नवीन गाण. दर वेळी तुमच्या Brain मध्ये नवीन न्यूरॉन्सची वाढ होत असते. तुम्ही गिटारमध्ये इतके गुंग होऊन जाता कि तुम्ही अजून कुठला तरी दुसरा विचार करण जवळजवळ अशक्य होऊन बसतं. म्हणजेच,

“म्युजिक तयार करताना तुम्ही चालू क्षणात पूर्ण पणे गुंतून जाता. आणि हि एक प्रकारची साधना आहे हे तुमच्या लक्षात येतं.”

भावनिक फायदे

तुमच्या भावनांना क्रिएटीवली एक्प्रेस करण केव्हाही चांगलंच! आणि म्युजिक हा एक त्यातलाच प्रकार. कोणी दुसऱ्याने तयार केलेली गाणी तुम्ही वाजवता तेव्हा त्यात तुमचा भावनिक दृष्टीकोन वागल्या पद्धतीने तुम्ही मांडू शकता. हि एक मुक्त कला आहे.

“म्युजिक सोबत तुम्ही तुमच्या भावना एका वरच्या पातळीवर जाऊन प्रकट करत असता.”

गाण लिहिणाऱ्याने मांडलेली बाजू तुम्ही अजून सबळ रीतीने मांडत असता. रिसर्चनंतर हे देखील कळले आहे कि वाद्य वाजवणारा आणि त्यासोबत गाणारा हे त्यावेळी सेम तरंगांवर स्वार होऊन परफोर्म करत असतात. त्या दोघांमध्ये एक कनेक्शन तयार होते. म्हणून तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत तुम्ही एखादी मेहेफील तरी नक्कीच बसवू शकता. त्यामुळे तुम्ही आणखीन जवळ याल.

सोशिअल फायदे

Brain Waves Syncing शिवाय अजूनही बरेच फायदे आहेत. म्युजिक तुम्हाला बाकी बऱ्याच पद्धतीने एकत्र आणतं. म्युजिक हि एक सोशिअल कला आहे, फोटोग्राफी, लेखन किंवा चित्रकले सारखी हि नाही. म्युजिक नॉर्मली लोकांपुढे सदर केलं जातं (ऑब्वीअसली, असा काही हार्ड-एन-फास्ट रूल नाहीय). पण लोकांपुढे तुम्ही कला लाइव सादर करण्यासारखं दुसरं सुख नाही. आणि मुख्य म्हणजे, तुम्ही एकटे बसून तासंतास केलेला सराव तेव्हा वासूल होत असतो.

“तुमच्या ह्या आवडीमुळे तुम्हाला बरीच अशी लोकं भेटतील जी तुम्हाला कधीच भेटली नसती. आणि कलेत रस असणारी माणसं आयुष्यात असण केव्हाही चांगलंच!”

आता सध्या माझ्या आयुष्यात बरीच अशी ध्येय वेडी माणसं आहेत जी मला गिटारशिवाय कधीच भेटली नसती. कलेची आसक्ती असणारी माणसं मनाने प्युर (निर्मळ) असतात, कारण त्याशिवाय त्यांची ती कला बाहेरच येऊ शकत नाही. अशा लोकांमुळे आयुष्यात Positivity वाढते.

 

इतर फायदे

  • एखादी अवघड गोष्ट शिकल्याचं समाधान.
  • रोज नवीन गोष्टी करायला मिळतात.
  • सरावासाठी वेळ adjust करता करता वेळेचं महत्व कळतं.
  • शब्दांशिवाय संवाद साधता येतात (अर्थात, हि लेवल यायला थोडा वेळ जातो, but yes you can do that)
  • तुम्हाला चांगला छंद जोपासायला मिळतो.
  • सर्व मित्रांमध्ये तुम्हीच एकटे ‘कूल डूड’ असता (पण केवळ या फायद्यासाठी गिटार शिकण केव्हाही चुकीचंच, ह्या attitude ने तुम्हाला कधीच पूर्ण शिकता नाही येणार).
  • तुम्ही उभे राहून वाजवता, त्यामुळे कॅलरिज बर्न होतात (म्हणूनच बहुदा सगळे गिटारिस्ट ‘बारीक’ असतात 😛 ).
  • हे सुख चिरंतर आहे.

 

अजून खूप फायदे आहेत, पण आता ते तुम्ही खाली दिलेल्या comment मध्ये सांगा! आणि आवडलं तर नक्की शेयर करा. तुमच्या मित्रांना कळू द्या कि गिटार वाजवायला शिकण नुसतं स्वप्न नसावं. आणि कुणास ठाऊक हे इतके फायदे ऐकल्यावर तरी ते गिटार शिकायला घेतील.

Facebook Comments

Related Posts

No Comments

Leave a Reply