Being Celebrity

Finally ‘येथे कविता लिहून मिळतील’ कवितासंग्रह प्रकाशित झाला, त्याबद्धल ५-६ बातमीपत्रात आर्टिकल सुद्धा आलं. मित्रांच्या शुभेच्छा सोशिअल मिडिया वरून भरभरून आल्या. काही महिन्यातच मला माझ्या वाचकांच्या प्रतिक्रिया मिळू लागल्या. त्यात पुन्हा पुन्हा विचारला जाणारा प्रश्न हाच होता कि, ‘आता पुढलं पुस्तक/कवितासंग्रह कधी येतोय?’. पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं.

कवितासंग्रह तर झाला, पण आता पुढे काय? .. पुढे अजून काहीतरी वेगळं केलं पाहिजे.

आणि मग माझ्या कवितांच्या मदतीला धावून आली ती माझी अर्धांगिनी :p माझी गिटार 🙂 . कशी? अहो गेली कित्तेक वर्षे मी कविता लिहित होतो, आणि गिटार शिकत होतो. म्हंटल आता ह्या दोन्ही कलांचा मिलाप करण्याची वेळ आली आहे! आणि तसंच केलं. ‘माझं चॉकलेट’ च्या यशस्वी प्रयोगानंतर मी बाकी कविता सुद्धा ‘गिटारमय’ करायला सुरुवात केली.

वेगवेगळ्या जागी त्या कवितांचं सादरीकरण केलं. वेगवेगळे किल्ले, पिकनिक स्पॉट, कार्यक्रम अशा जागी ‘येथे कविता लिहून मिळतील’ चे गिटारमय कार्यक्रम चालूच ठेवले. ‘लोकांचा कवी’ आता ट्रेक पिकनिक करत फिरणाऱ्या भटक्या तरुणांचा कवी सुद्धा झाला होता.

कविता करता करता आपण एक celebrity आहोत हा feel आयुष्यात आला तो ‘Youth Inspirators  Network’च्या एका कार्यक्रमामधून.  नेरूळच्या ‘स्टर्लीन कॉलेज’मध्ये तरुणांना inspiration देण्यासाठी आलेल्या दिग्गज मंडळींमध्ये स्टेजवर बसण्याचा योग जुळून आला. (Seriously.. खरंच.. म्हणजे इथे मी त्या तरुणांच inspiration होतो, Common Yaar !! अजून काय पाहिजे लाईफमध्ये!!) प्रोग्राम झाल्यावर कविता आवडलेले विद्यार्थी सेल्फीसाठी, सहीसाठी (‘सही’ जी आता ‘Autograph’ पण झाली होती) आजूबाजूला गर्दी करू लागली.

‘Excuse Me Sir, मला तुमचा Autograph हवाय!’, ऐकल्यावर मलाच माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता.

being-celebrity-_-sterline-college‘कवी’ यशवंत दिडवाघ, double graduate असून सुद्धा सही करताना पेन कसा पकडायचा हे २ सेकंदासाठी विसरले होते. आजही हसू येत ते आठवलं कि.. ‘सर, वकिली करता करता कसं काय सुचतं तुम्हाला एवढं सगळं!’ ‘कोणते वकील आहात तुम्ही सर, क्रिमिनल कि साधे वाले’. कशात करियर करावं या विचारात गुरफटून गेलेल्या जिज्ञासू मुलांनी प्रश्नांचा भडीमार चालूच ठेवला. आणि मी आपला ‘आता यांना काय सांगू.. माझ्याच करियरचं मला नक्की माहित नाहीय! आयुष्यात मजा करतोय बस.. बाकी काही नाही!’ असा विचार करत आतल्या आत हसत राहिलो.

मला एक Celebrity म्हणून कसं वागायचं हे अजूनही समजलं नव्हतं. आणि मुळात मला ते समजून घ्यायचं सुद्धा नाहीय, मी आपला साधा मुलगा म्हणून वावरलेलंच बर बाबा!

त्यानंतर मुंबईच्या झेविअर्स सारख्या नावाजलेल्या कॉलेजच्या ‘मराठी वाड्मय मंडळाच्या’ कार्यक्रमाचा हिस्सा होता आलं. तिथे ही मी ‘माझं चॉकलेट’ सर्वांना पुरेल इतकं वाटून आलो 🙂 . पुढे ‘येथे कविता लिहून मिळतील’ च्या Android App  मुळे ते अजून खूप जणांपर्यंत पोहचलं. अगदी आजही त्या app मधून कविता लिहून देण्याच्या फर्माइशी येतात. लोकं मी कितीही अनोळखी असलो तरी त्यांच्या कवितेत त्यांच्या बद्धल काय काय लिहून हवंय ते अगदी खुल्या मनाने सांगतात. आपण कोणाच्या तरी विश्वासास पात्र ठराव ह्यातच खर सुख मिळत बघा मला!

dsc_6215

Leave a Reply