बदल

.
टुकार टिक-टॉक व्हिडीओ सुद्धा गाजतो इथे,
मोर नसतो पावसात, मुंबईकरच नाचतो इथे,
.
हौसेने ओलीचिंब होणारी लोकं सर्रास दिसतात,
आणि गरीब छत्री विक्रेता, पावसात भिजतो इथे,
.
मेहनतीने वस्तू विकणाऱ्या सोबत हुज्जत घालता,
म्हणून त्याचाच मुलगा भीक मागताना दिसतो इथे,
.
शहरी लोकं साली अशीच सगळी, जाड कातडी,
मग मध्येच बिबट्या घरात घुसून फाडतो इथे,
.
या मायनगरीच पाणी जड आहे म्हणतात,
म्हणून पावसात प्रत्येक नाला तुंबतो इथे,
.
उन्हाळ्यात फेकलेल्या आंब्याच्या कोईचा कोंब,
माती मिळत नाही म्हणून सिमेंट मध्येच रुजते इथे,
.
तुम्हीच नाही एकटे लोखंडवाला मध्ये राहणारे,
कावळा पण तारेचं घरटं बांधतो इथे,
.
सगळ्यांनीच राहणीमान बदलून टाकलं समजलं की,
गुलाबी कवी सुद्धा या अशा ओळी लिहितो इथे..
.
.
.
ता. क. :- कवीच्या इतर कविता पुस्तक स्वरुपात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Related Posts

 • Reply Sankalp Ghosalkar July 11, 2019 at 8:07 pm

  खूप छान कविता केली आहेस. 👌

  • Reply admin July 11, 2019 at 10:07 pm

   धन्यवाद संकल्प 😃 🙂

 • Reply shweta July 11, 2019 at 9:02 pm

  Keep posting such poems..

 • Reply admin July 11, 2019 at 10:08 pm

  Yes .. sure.. keep showering your blessings and comments 🙂

 • Leave a Reply