advantage India from challenge to opportunity marathi book review

Advantage India – From Challenge to Opportunity

निवडणुकीचा सीजन आणि हे पुस्तक वाचण्याचा झालेला मूड. जबरदस्त कॉम्बिनेशन!

डॉ. अवुल पाकीर जैनुलाब्दीन (APJ) अब्दुल कलाम आणि श्रीजन पाल सिंग यांच्या प्रगल्भ ज्ञानाचा या पुस्तकामार्फत युवा पिढीला दिशा देण्यासाठी छान प्रकारे वापर केला गेला आहे.

तुम्ही जिज्ञासेपोटी एक-दोन पानं वाचायला सुरुवात करता आणि पुस्तकातील दोघांचे व्यक्तिगत अनुभव, तांत्रिक माहिती आणि किस्से वाचता-वाचता कधी तुम्ही हातात मार्कर घेऊन महत्वाचे संवाद अधोरेखित करायला सुरुवात करता ते तुमचं तुम्हाला देखील कळत नाही.

२०२० चा भारत देश आणि त्याची आर्थिक, व्यावसायिक तसेच मुलभूत गरजा भागवण्याची क्षमता कशी असावी, किंवा ती कशी छान ठेवता येईल यावर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.

भारताचा इतिहास सांगता सांगता प्रगतीच्या दिशेने केलेली आगेकूच, त्यात इंग्रजांनी कानामागून येऊन तिखट होऊन केलेली भोळ्या भारतीयांची पिळवणूक, मग ह्या सगळ्यावर बुद्धीच्या जोरावर पिळवणूकीच्या परतफेडीसाठी बनवलेले यशस्वी प्लान्स वाचता वाचता एक भारतीय म्हणून गर्वाने छाती फुगून येते. लवकरच भारत विकसित देशांमध्ये गणला जाईल हे स्वप्न सत्याच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले आहे असा भास होतो.

युवा पिढीने हे पुस्तक जरूर वाचावं कारण, यामध्ये आपण भूतकाळात केलेल्या चुकांना कसं सुधारता येईल, आणि त्याहून पुढे, भविष्यात येणाऱ्या अडचणींवर उपाय कसे काढता येतील याचे विचार मंथन केले आहे. या पुस्तकाच्या लेखकांना यशवंतचा मानाचा सलाम!

तुमचं स्वतःच पुस्तक आजच विकत घ्या!

पुस्तकाची लिंक : पेपर आवृत्तीइंग्रजी kindle आवृत्ती

ओन्लाईन मराठी आवृत्ती उपलब्ध नाही आहे, आयडियल बुक स्टोर दादर मध्ये ती मिळेल.


 पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.

वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.

For Other Products by the same brand Click here

वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.


Yashwant didwagh

यशवंत दिडवाघ

पुस्तकांपासून लांब पळणारा मी, कधी पुस्तकांमध्ये रमायला लागलो कळलंच नाही. पण आत्ता… मी पुस्तकांच्या प्रेमात पडलोय. तुम्ही पण बघा एकदा पडून (अर्थात प्रेमात)!

Facebook Profile

Instagram Profile

ता.क.१.  तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.

ता.क.२ तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *