‘Advanced’ पिढी!!

रिमझिम पाऊस पडत होता. आमच्या एरियातल्या फोटो स्टुडीओ बाहेर एक १६ १७ वर्षाची मुलगी त्या संथ पावसात भिजताना दिसली. नवीन नवीन कॉलेजला गेलेली असावी ती कदाचित. तिच्या सोबत तिची एक मैत्रीण सुद्धा होती, पण ती शांत आडोशाला पानीपुरी वाल्याच्या शेड मध्ये उभी होती. रगडापुरीच्या रगड्याचा मस्त तोंडाला पाणी येईल असा वास सुटला होता आणि त्या दोघींमध्ये एकदम मोठ-मोठ्याने संवाद चालू होता..

‘dad कब आयेंगे यार!!’, शेडमध्ये थांबलेली मुलगी कंटाळून म्हणाली.

‘इनोवा दिखेगीना दुरसे ही.. तू टेन्शन क्यू ले रही हे इतना..’ भिजणारी तिचे केस मोकळे करून हवेत उडवत बोलत होती. तिझ्याकडे छत्री असून पण ती भिजत होती आणि बोलताना ‘इनोवा’ शब्द तर असा उच्चारला जसं काय पूर्ण मुंबईत तिच्या एकटीकडेच गाडी आहे.

‘यार..!! इतनेमे तो मे पुरा दहिसर कांदिवली घूम के आती थी..क्या ये पापा भी ना..’, आणि अजून बराच काय काय पुटपुटत उभी राहिली. पावसात भिजणारी मुलगी आता अजूनच चाळे करायला लागली. हात हवेत मोकळे करून गोल गोल काय फिरत होती; मधेच वर बघून परत खाली काय बघत होती.

‘हिंदी सिनेमे बघून आजकालची मुलं लयच काय तरी करायला लागलीत.. देवा!’, असे लुक्स देऊन आजूबाजूच्या काक्या-माम्या जात होत्या. त्या मुलीच्या हालचालीच अशा होत्या कि रस्त्यात जाणारा प्रत्येक माणूस तिला बघून जात होता. रगडापुरीवाल्या अंकलने पाहिलं कि समोरच्या रस्त्यावरची मुलं ती मुलगी भिजताना तिच्याकडे बघतायत. त्यांची नजर त्यांनी ओळखली आणि त्या मुलीला हाक मारली..

‘बेटी..’ आणि हाताने ‘इधर आओ’ असं खुणावून सांगितलं.

मुलीने त्यांच्याकडे पाहिलं आणि दुर्लक्ष करत म्हणाली, ‘क्या हुआ अंकल.. कूछ मुफ्त में खिला रहे हो क्या..!’. त्यावर दोघी अजून मोठ्याने खिदळू लागल्या. मला पहिलं वाटलं कि हे एकमेकांना ओळखतात म्हणून एवढं बिंदास बोलन चालू आहे. पण त्या अंकलच्या पडलेल्या चेहेऱ्यावरून समजलं कि त्यांना ते खराब वाटलय. झालेल्या अपमानाची परवा न करता त्यांनी तिला परत हाक मारली. ह्या वेळेला त्यांचा आवाज अजूनच बिच्चाऱ्यासारखा झाला होता, ‘अरे बीटीया वो लडके तुम्हे देख रहे हे, इधर आओ’

तिला त्याची काहीच पडलेली नव्हती. त्या पानीपुरी वाल्याला ती नंतर जे काही बोलली त्यावरून माझी खात्री पटली कि, ती त्या टवाळ पोरांनी बघाव यासाठीच हे असले हिरोईनचे चाळे करत होती.

‘देखने दो ना अंकल.. उसमे क्या .. ये सब मेरे भाई जैसे है.. तो फिर मुझे देखेंगेहीना.. लडको देखो मुझे और देखो’. त्या मुलांपर्यंत तिचा आवाज गेला कि नाही मला माहित नाही.. पण तेवढ्यात माझा फोटो काढायला नंबर आला म्हणून मी आत गेलो. आत जाता जाता त्या अंकलची आणि माझी नजरा नजर झाली. ते एकदम अलगत हसत होते आणि म्हणाले, ‘आज कलके बच्चे बोहोत advance हो गये हे!!’.

तितक्यात तिची मैत्रीण पण तिच्या बोलण्यावर सहमती दाखवत म्हणाली, ‘येस माय फ्रेंड.. सारे भारतीय मेरे भी बांधव है..’ आणि दोघी पुन्हा खीखीखी करू लागल्या..

 

मला खरच कळलं नाही, ह्याला ‘स्त्रीपुरुष समानता’ म्हणायचं, आई वडिलांचीच चूक आहे म्हणायच कि, आज कालची ‘advanced पिढी’ बोलून दुर्लक्ष करायचं… तुम्हीच सांगा.. !!?

Related Posts

Leave a Reply