#आरेे_असं_कसं

【दोन प्रकारे आरे बद्दल विचार मनात येतात.】

अरे मधील झाडं कापली जातायत या बद्दल खेद वाटत आहेच.

●पण पर्यावरणाचा पुळका आलेले अनेक लोक आज घरातला, ऑफिसातला एसी काढून टाकणार का?

●एसी गाड्यांमधून फिरणे बंद करणार आहेत का?

●इतके तज्ञ आहात तर कोर्टात का उत्तरं देता आली नाहीत?

●मेट्रो आल्यावर मोठ्या संख्येने लोक आपल्या वयक्तिक गाड्या घरीच ठेऊन सार्वजनिक वाहतूक म्हणून मेट्रोने प्रवास करतील. किती कार्बन एमिशम कमी होईल अंदाज आहे का?

●आरे चा एकूण एरिया किती आणि सरकार झाडे कापतोय तो एरिया किती हे माहीत आहे का?

●जंगलं कापून, झाडं कापून अनाधिकृत झोपडपट्ट्या तयार होतायत त्याला करा ना विरोध..

●विरोध करणाऱ्या संस्थांना बाहेरून चीन, पाकिस्तान आणि अश्याच भारतात विकासाच्या विरोधी देशांचे पाठबळ मिळत नसेल कश्यावरून?

●झाडांवर इतकं प्रेम आहे तर 4 झाडं स्वतः लावून जागवून दाखवा ना!

●मेट्रोला विरोध नाही पण कार शेड ला आहे! अरे पर्यायी जागांवर नाही जमणार आहे.. कार शेड ही कोणत्या तरी टोकाला असणे आवश्यक आहे! फोर्ट च्या टोकावर ऐतिहासिक वास्तू आहेत.. ! हो नाही जमणार तिथे.
आणि सात आठ किलोमीटर वर तुम्ही सुचवलेल्या पर्यायी जागांवर कार शेड बनवायला किती सिमेंट काँक्रीड आणि इतर माल लागेल.. गोळा बेरीज एकच.

मेट्रो ट्रेन धुवण्यासाठी म्हणे जमिनीतलं पाणी वापरणार… आणि त्याने ग्राउंड वॉटर लेव्हल कमी होणार.. मी तर ऐकलंय की मुंबई च्या चारी बाजूने समुद्र आहे तर लेव्हल कशी कमी होईल 😅 आणि आता मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे च्या ट्रेन काय धुतल्याच जात नाही?

●बरं अनेक झाडं उखडून परत तिथेच जवळपास लावण्यात येणार आहेत… आणि बाकी नवीन झाडं लावून जगवूया..
स्वतः गाड्या कमी वापरा.. एसी लावू नका.. हे जमणार नाहीच!

●आंदोलन कर्त्यांना आत टाकलं!
मग पोलिसांना ढकलून, रात्री अपरात्री मालमत्तेची नुकसान होईल हे प्रशासनाने बघत राहायचे की काय?

ख्रिस्ती शाळेत शिकलेले किंवा बेकार बेरोजगार लोक धावतायत आपले विरोध दर्शवायला..

अनेकांना वन्य प्रजातींचा पुळका आलाय… आणि तो योग्य सुद्धा आहे. पण मी ऐकलंय की फक्त 10 किंवा पंधरा बिबटे शिल्लक आहेत. ते कुत्रे वैगेरे खायला शेजारच्या अतिक्रमित मानवी वस्तीत शिरतात.. मग चूक कोणाची..
हे विरोध करणारे मटण खाऊन येत नाहीत कशावरून.. म्हणजे मुक्या प्राण्यांना शिजवून खाणाऱ्यांना खरच मुक्या जीवांचा पुळका आहे का! 😅
निसर्गाची किती तरी हानी प्रत्येक जण किती तरी प्रकारे करतोय मग हे आरे ला कारे चे नाटक कशासाठी..

सगळं रचलेलं दिसतं..

【दुसरा..】

●आतापर्यंत मेट्रो लाईनच काम जितकं चालू आहे, त्यात अनेक मोठे वृक्ष तोडले गेलेयत.. अगदी भकास वाटतं. एकही झाड लांब लांब पर्यंत दिसत नाही.
अनेक रस्ते ओसाड झालेत, ऊन थेट अंगावर पडून शरीराची लाही लाही होतेय..

●झाडच आहेत जे माती धरून ठेवतात..
झाडं संपताच हे सिमेंट काँक्रीटच जंगल समुद्राच्या पाण्यात विरघळून जाणार नाही कशावरून..

◆पण नवीन चांगलं काही हवं असेल तर आपल्याकडचे थोडे काही गमवावे लागतेच.. कशाचा तरी बळी द्यावाच लागतो.. कुठे तरी मन मारावेच लागते.. मला हे पण पाहिजे आणि ते पण पाहिजे असा बाल हट्ट चालत नसतो.

सरकार ने विषय गांभीर्याने लक्षात घ्यावा.. घेत असतीलही…

(मी काय म्हणतोय हे सगळ्यांना पटणार नाही, कळणार नाही. कोणी सहमत असेल तर काही लोकं विरोधात बोलत राहणार.. #कारण_लोकशाही_आहे.)

कमेंट मध्ये तुमचं मत बिनधास्त मांडा, आणि मित्रांमध्ये शेयर करा.

 


सिद्धेश तिवरेकर

Facebook Profile.

Related Posts

Leave a Reply