९ मुद्दे – जोडीदाराबद्धल पजेसिव्ह होणं कसं थांबवाल

आपल्या जोडीदारावर आपला पूर्ण हक्क असतो हे १०० टक्के खरं आहे. पण ह्याच हक्काचं ‘ओवर पजेसिव्हनेस’ मध्ये रुपांतर ह्वायला वेळ लागत नाही. आणि हळूहळू आपल्या नात्यावर त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात.

ह्याची बरीच कारण असू शकतात… जसं कि .. अविश्वास, जेलस फील होणं, स्वतःला आपल्या जोडीदारापेक्षा कमी लेखण. जर का तुम्हाला असं वाटतंय कि तुम्हीही ह्या ‘ओवर पजेसिव्हनेस’च्या जाळ्यात अडकताय तर… ह्यापुढील ९ टिप्स तुमच्यासाठीच आहेत.

१. भूतकाळाला करा राम-राम!

याआधीच्या रीलेशनशिपमध्ये झाले असतील काही प्रॉब्लेम्स; तुम्हाला कोणी फसवल असेल, खोट्या शपथा घेतल्या असतील आणि त्या पूर्ण केल्या नसतील. पण त्याचा ह्या चालू रिलेशनवर परिणाम होऊ देऊ नका. सगळी माणसं सारखी नसतात. फ्रेश स्टार्ट झालीच पाहिजे. आणि तसंही भूतकाळाला बदलणं अशक्य आहे. कशाला नसत्या विचारात मेंदूच्या पेशी मारायच्या!

२. जोडीदारासाठी ‘जड’ बनू नका.

छोट्या छोट्या गोष्टीसाठी जोडीदाराला विचारण, किंवा उगाच मनाला काळजी लावणं कि “आपल्यावर होणारा प्रेमाचा वर्षाव कमी तर नाही न झाला?” तुम्ही जितकं तुमच्या पार्टनरवर शंका येईल अशा प्रश्नांचा भडीमार करणार तेवढाच तो तुमच्यापासून लांब जाणार. त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण त्यांनीसुद्धा तुमची निवड केली आहेच ना! त्यांना तुमच्या शिवाय कुठे बाहेर जायचं असेल तर जाऊ द्या. आणि हो.. जोडीदार एकटा फिरून आल्यावर कोर्टात आरोपीला प्रश्न विचारले जातात तसे विचारू नका. नाहीतर त्यांना सतत असं वाटत राहिल कि ते काही तरी चुकीचं करतायत. कदाचित असही होईल कि ते चांगलं वागण मुद्दामच बंद करतील (मग बसा बोंबलत!).

३. जगा आणि जगू द्या

तुमचं व्यक्तिमत्व वेगळ असेल, इंटरेस्टिंग असेल; तर तुम्ही बऱ्याच जणांना आवडाल. त्यासाठी तुमचं काम, तुमची सोशिअल लाईफ, तुमच्या आवडी-निवडी जपणं गरजेचं आहे. (सेम, तुमच्या पार्टनरला सुद्धा). यात वाद नाहीच कि एकत्र टाईम स्पेंड करावा. पण त्यासोबत वेगळ्या गोष्टींमध्ये पण गुंताव, म्हणजे तुम्हाला एकमेकांना सांगण्यासाठी नवीन वेगळ काहीतरी असेल, ज्यामुळे तुम्ही इंटरेस्टिंग बनाल.

४. ‘जलकुकडा’ स्वभाव नको!

असा स्वभाव ज्याचा असतो त्यालाच जास्त त्रास होतो. ह्या स्वभावाला थोडा वेगळ वळण द्या, एक सकारात्मक वळण. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गुणांची जाणीव होईल, आणि तुमच्या मनात नकळत सुरु झालेली दुसऱ्यांसोबतची स्पर्धा बंद होईल. आपल्या जोडीदाराला दुसऱ्यांसोबत बघून असे विचार मनात आले तरी हे लक्षात असू द्या कि ‘तुमच्या सारखा जोडीदार त्यांना मिळाला हे त्यांचं सुद्धा भाग्याच आहे’.

५. एकमेकांच्या मित्रपरिवाराला जाणून घ्या.

वरचा मुद्दा तुम्हाला त्रास देण बंद करेल जेव्हा तुम्ही एकमेकांच्या मित्रांना ओळखू लागाल. कारण सगळ्यांचे स्वभाव कळल्यावर विनाकारण मनात येणार विचार बंद होतील. आणि असंही होऊ शकत कि पार्टनरचे फ्रेंड्स तुमचेसुद्धा चांगले मित्र बनतील.

६. जोडीदाराचा स्वभाव बदलण्याची गरज नाहीय

रिलेशन सुरु होत असतानाच तुम्हाला तुमच्या पार्टनरचा स्वभाव माहित असतो. किंबहुना तुम्ही त्यामुळेच त्यांच्या प्रेमात पडलेले असता. (फक्त स्वभाव बघून रिलेशनमध्ये पडणाऱ्यांच बोलतोय इथे आपण 😛 ) मग एकदा स्वतःला विचारा कि आता आपल्याला त्यांचा स्वभाव बदलण्याची गरज का भासते आहे.

७. जोडीदारावर विश्वास ठेवा आणि स्वतःवर सुद्धा.

बऱ्याचदा आपल्याला इनसिक्युर वाटतं, कारण आपण आपल्याच दृष्टीकोनातून सगळ्या घडामोडी बघत असतो. उदाहरणार्थ – आपला जोडीदार बाहेर फिरायला गेल्यावर इतरांसोबत फक्त फ्लर्ट करेल कि अजून त्यापुढे सुद्धा जाईल? जर का तुमचा स्वतःवर विश्वास आहे कि तुम्ही पार्टनर शिवाय फिरायला जाता तेव्हा तुमच्या लिमिट्स मध्येच फ्लर्ट करता तर पार्टनर बद्धल संशय घ्यायची गरज नाही.

८. गुप्तहेर – ऑन ड्युटी!

कितीही कंट्रोल केला तरी लपून-छपून माहिती घ्यावीशी वाटणं साहजिक आहे. मग त्यासाठी जोडीदाराचं मोबाईल लॉक कसं आहे ते डोळ्याच्या कोपऱ्यातून बघण, किंवा बाकीचे पासवर्ड काय आहेत ह्यांची टीप काढण, हे सुरुवातीला नॉर्मल वाटेल. पण ह्यामुळेच नात्यात दुरावा येऊ शकतो. पार्टनरची ब्राउजर हिस्ट्री नाही पाहिली तर काय डोक्यात दगड पडणार आहे का! पण असं करताना जर का तुम्ही पकडले गेलात तर परिस्थिती (उगाच्या-उगाच काही कारण नसताना) हाताबाहेर जाऊ शकते. एकमेकांना मोबाईलचं लॉक किंवा पासवर्ड सांगणं म्हणजे रिलेशनमध्ये पारदर्शक असणं असंही काही नाही. विश्वास ठेवण, हा एकंच साधासरळ मार्ग. मग हेरगिरी करण्याची गरज नाही.

९. मोकळ होऊन संवाद साधा.

तुमची अडचण सांगताना त्यांना ती तक्रार वाटणार नाही ह्या शब्दात तुम्हाला सर्व सांगता आलं पाहिजे. तुम्हाला काही गोष्टी अस्वस्थ करत असतील तर तसं स्पष्ट सांगा, तुमच्या भूतकाळातल्या काही घटनांचा त्याच्याशी काही संबंध असेल तर तो हि सांगा. आणि ह्याची खबरदारी असुद्या कि हे सगळं एका चर्चेच्या स्वरूपात होईल, भांडणाच्या नाही. तुम्ही मोकळ्यामनाने सुरुवात केली तर ते सुद्धा त्याचं खुल्यामनाने स्वागत करतील. आणि काही गोष्टी समोर मांडल्याने दोघांनापण त्यावर फ्रीली मतं मांडता येतात.

ह्या टिप्स आवडल्या असतील तर तुमच्या पार्टनर सोबत नक्की शेयर करा, किंवा (तुम्ही सिंगल असाल तर) तुमच्या ज्या मित्रमंडळींना पार्टनर आहे त्यांच्या भल्यासाठी त्यांच्या सोबत शेयर करा. (सिंगल असलेल्या वाचकांनी हि लिंक ११ जणांना पाठवली तर त्यांना लवकरच एक खूष खबर मिळेल. 😛 . ते स्वतः कमिटेड झाल्याची खबर!! 😛 )

 

Related Posts

Leave a Reply