यशस्वी रिलेशनशिपसाठी ह्या ८ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

रिलेशनशिप मध्ये ‘आय लव्ह यु’ बोलणं जितकं महत्वाचं असत तितकंच ते मनापासून वाटणं देखील महत्वाच आहे. मग तुम्ही ते सारखं बोलून दाखवलंचपाहिजे असं काही नाही. आणि नात्यात प्रेमापेक्षाही जास्त महत्वाच्या काही गोष्टी असतात ज्या त्या नात्याला स्ट्रॉंग बनवतात. ज्यामुळे तुम्ही हॅपिली टुगेदर फॉरेव्हर टाईप कॅटेगिरीमध्ये पोहचता.

१. संवाद – दिवसभरातल्या प्रत्येक गोष्टीच अपडेट देणं म्हणजे फक्त संवाद नसतो तर तुम्हाला तुमच्या नात्यामधील आवडलेल्या व न आवडलेल्या गोष्टी मोकळेपणाने सांगणं , प्रॉब्लेम्स संवादाने सॉल्व्ह करण , एकमेकांचे विचार समजून घेणं आणि फक्त बोलणंच नाही तर पार्टनरच ऐकून घेणं नात्याला अजून स्ट्रॉंग बनवत . तुमच्या मनात असलेली प्रत्येक गोष्ट जर तुम्ही बिनधास्त तुमच्या बेटर हाल्फ सोबत शेयर करू शकत नसाल तर काय अर्थ आहे ना?

२. ट्रस्ट – विश्वास – कोणत्याही नात्यामध्ये विश्वास हा सर्वात जास्त महत्वाचा फॅक्टर आहे . जर तुम्हाला तुमच्या पार्टनर वर विश्वास नसेल तर तिथे इन्सिक्युरिटी असते आणि असं नात हेल्दी नसत. पण विश्वास हा नेहमीच निर्माण करता येऊ शकतो आणि नात्याच्या  सुरुवातीला जरी तुमच्यामध्ये विश्वास नसेल तरी  तो डेव्हलप नक्कीच करता येतो. बेस्ट पार्टनर तो आहे जो  तुमच्या ‘पास्ट’पेक्षा तुमच्या आजला जास्त मह्त्व देतो.

३. आदर – एकमेकांचा , एकमेकांच्या विचारांचा आदर करण हा कोणत्याही नात्याचा महत्वाचा भाग आहे कारण जिथे रिस्पेक्ट असतो तिथे प्रेम असतंच . सर्व यशस्वी रिलेशन्स मध्ये दिसणारी सामायिक गोष्ट म्हणजे त्यांचा एकमेकांबद्दल असणारा आदर . यात आपल्या पार्टनरचे विचार, फिलिंग्स, प्रायव्हसी आणि स्वभाव जसा आहे तसा ऍक्सेप्ट करण हे सगळं येतं.

४.ऍप्रिसिएशन – असं नाही कि आपण आपल्या जवळच्या लोकांची स्तुती करत नाही पण बऱ्याचवेळा काही गोष्टी ग्रांटेड घेतल्या जातात ज्यामुळे नात्यामध्ये अंतर वाढत जातं . त्यामुळे  तुमचा पार्टनर तुमच्यासाठी देत असलेला वेळ, तुमच्यासाठी नेहमी करत असलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी या सगळ्याकडे दुर्लक्ष न करता कधीतरी थँक यु बोलणं, तसेच त्यांच्या पर्सनल लाईफ मधील गोष्टींसाठी एन्करेज करण मस्ट आहे.

5.शेयरिंग रिस्पॉन्सिबिलिटी – प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांवर ब्लेम करण, कोणत्याही गोष्टीची जबाबदारी न घेणं, ह्या सवयी रिलेशनशिपला कमकुवत बनवत असतात . कोणत्याही हैप्पी रिलेशनसाठी प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी  एकत्रितपणे घेणं, योग्य वेळी कॉम्प्रमाइज करण, प्रोब्लेममध्ये एकत्र निर्णय घेऊन मार्ग काढणं आणि अशावेळी एकमेकांना आधार देणं खूप आवश्यक असतं.

६.पर्सनल स्पेस – आवडत्या व्यक्तीसोबत प्रत्येक क्षण असावंस वाटण साहजिक आहे पण कोणतीही गोष्ट अति झाली कि ती हानिकारक असते आणि हाच नियम नात्यांनाही  लागू होतो. जगातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःची वेगळी स्पेस असणं गरजेचं आहे हे समजून घ्यायला हवं आणि स्वतःसाठी खास वेळ देणं व रिलेशनशिप मध्ये हेल्दी डिस्टन्स मेन्टेन करण जमायला हवं. सेल्फ लव्ह, सेल्फ इम्प्रुव्हमेंट नेहमीच हॅपी रिलेशनशिपला  अट्रॅक्ट करतात .

७. अंडरस्टँडिंग – जेव्हा नात्यांमध्ये विश्वास असतो तेव्हा एकमेकांना समजून घेणं आपोआप जमत आणि मग ऑनलाईन असून रिप्लाय का नाही केला , कॉल बॅक करायला इतका वेळ का यामुळे भांडण होत नाहीत . बऱ्याचदा    काही गोष्टींमुळे प्रत्येकाचा स्वभाव आणि विचारांमध्ये बदल होऊ शकतात अशावेळी ते समजून घेणं तुमचं रिलेशन बेस्ट आहे हे सांगत.

८. कमिटमेंट – जर तुम्ही तुमच्या पार्टनर  सोबत लॉयल किंवा कमिटेड नसाल तर तुम्ही रिलेशन मध्ये का आहात हाच खरा महत्वाचा प्रश्न आहे . कोणत्याही यशस्वी नात्यासाठी त्यात कमिटमेंट आणि ट्रान्सफरन्सी  असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे.

हे सगळं तुम्हाला कळलं आणि योग्य वेळी वळलं कि तुमचं नातं यशवंत होणारच!

Related Posts

  • Reply Drmeghna Sonawane July 8, 2018 at 3:15 pm

    Chan kharokher natyat mutual.understanding mahatvachi aste nahiter vinakaran avishvasamule chotya gostimi bhandne hotat v tyat suffer aapli mulehi hotat.

  • Reply Rohit Naik July 8, 2018 at 3:15 pm

    mst… yashwant… chan lihila aahes

  • Leave a Reply