६ फायदे – किबोर्ड वाजवयाला शिकण्याचे (लेखक – ओंकार बागल)

लहानपणी मी पेटी वाजवायचो, खूप मस्त वाटायचं आणि त्यामुळे मी स्वतःला नशीबवान समजतो 🙂 . आज मी जे काही आहे, ते ह्या वाद्यांमुळेच. इतरांपेक्षा वेगळं काहीतरी माहिती असल्याचं समाधान कायम माझ्या मनाला मिळतं. किबोर्ड आणि पेटी हि दोन्ही वाद्य तशी सारखीच आहेत म्हणा. मी लहानपणी सुरुवात पेटीने केली आणि आता किबोर्ड वर येऊन थांबलोय.

किबोर्ड शिकण्याचे खूप फायदे आहेत, त्यातले मला लक्षात आलेले हे ६ फायदे –

.       तुम्ही आपोआप संगीत शास्त्र शिकता. (तुमच्या गुरूने ते तुम्हाला शिकवले नाही तरी सुद्धा!). बहुसंख्य पाश्चिमात्य संगीत हे ह्याच वाद्यावर कंपोज केलं जातं. आणि मग तुम्ही एकदा का म्युजिक लिहायला शिकलात कि मग दिल्ली दूर नाही जनाब!

.       ‘म्युजिक-प्रोडक्शन’ मध्ये किबोर्डचा खूप उपयोग होतो. विकसित सॉफ्टवेयरच्या मदतीने ह्या वाद्यातून तुम्ही जवळ-जवळ सर्व प्रकारची वाद्य वाजवू शकता आणि पूर्ण म्युजिक-बँड तुमच्या बोटांच्या तालावर येतो.

.       मल्टी-टास्किंग स्कील्स शिकण्यासाठी ह्या ज्ञानाचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. कारण यात तुम्हाला तुमच्या हातांनी एकावेळी एकापेक्षा जास्त कामं करायची सवय लावावी लागते. जी तुम्ही संगीत शिकता शिकता आपोआप लागते. (म्हणजे असं समजू नका कि मी बाईक चालवता चालवता मेसेज टाईप करू शकतो.. विनोद निर्मिती 😀 .. असो).

.       म्युजिक लिटरेचरचा बऱ्यापैकी मोठा आणि बेस्ट पार्ट हा किबोर्ड किंवा पिआनो वरच वाजवला गेला आहे. (हो, किबोर्ड आणि पिआनो ही दोन वेगवेगळी वाद्य आहेत.)

.       जवळ-जवळ सगळ्याच म्युजिक-बँडस् मध्ये किबोर्ड-प्लेयरची गरज असते. तुम्ही हे वाद्य शिकलात तर ती जागा तुम्हाला मिळू शकेल. आणि तुम्हाला तर माहीतच असेल बँडमध्ये वाजवता हे कळालं कि आपला एक वेगळाच ‘वट’ असतो फ्रेंडसर्कल मध्ये! (जसं आता माझा आहे.)

.       तुम्ही हे वाद्य शिकलात कि किबोर्डशी निगडीत बाकी सगळी वाद्य ( म्हणजे पिआनो, ओर्गंस, सिंथेसायजर इत्यादी) तुम्ही पटकन शिकू शकता.

बस ना मग.. घ्या आता शिकायला. किबोर्ड संबंधी काही अडचण असेल तर बिंदास मला कॉल करा 8369-722-641. किंवा खाली माझी फेसबुक प्रोफाईल लिंक दिलीच आहे.

आणि अजून फायदे वाचायचे असतील तर, कोणतही वाद्य शिकण्याचे कॉमन फायदे तुम्हाला मी गिटार वाजवतो कारण.. ह्या लेखात वाचायला मिळतील.


ओंकार बागल

मी ओंकार, मी काही लेखक-बिखक नाहीय. मुळचा मी म्युजिशिअन. दादरकर. बालमोहनकर.

बऱ्याच स्टेज-शोज मध्ये वाजवून झालंय. बऱ्याच रेकॉर्डींग केल्या. सध्या दादर (रानडे रोडला) किबोर्ड शिकवणं – शिकण, झी-मराठी वर सिरीअलला म्युजिक देण, ह्या कामात बिजी असतो.

Visit Facebook Profile 


Related Posts

  • Reply Ravindra Mane July 8, 2018 at 2:37 pm

    ओंकार खुप छान लिहिले आहेस आता पुढे ते कसे वाजवायचे याबद्दल लिही . खुप वेगळा मार्ग निवडला आहेस .माझ्या खुप खुप शुभेच्छा.

  • Leave a Reply