Month: January 2018

  • “दादर”

    “दादर”

    ‘येथे कविता लिहून मिळतील’ कविता संग्रहात दुसऱ्यांसाठी मी बऱ्याच कविता लिहिल्या. पण ह्या कवितासंग्रहातली ‘दादर’ हि माझी सगळ्यात आवडती कविता… जी मी माझ्या स्वतःसाठी लिहिली होती. दादर मध्ये राहिलेल्या प्रत्येकाला हि कविता तितकीच भिडेल अशी आशा करतो..   “दादर” माया मुंबईची जणू काया आईची.. रंगीत साडीचा मखमली पदर.. दादर.. माझं अर्ध घर.. दंगलीने हादरलेली, गर्दी घट्ट धरलेली, अहोरात्र भार उचलत छातीवर,, दादर.. माझं अर्ध घर.. दिवाळीच्या दिव्यांनी लखलखणारी, मराठमोळी कोमल नारी, जणू स्वर्ग अप्सरा नांदते जमिनीवर, दादर.. माझं अर्ध घर.. मागेल ते ती लगेच देते, पोटाची बुद्धीची भूक भागवते.. आहे एक अनोखं ज्ञानाचं आगर, दादर.माझं अर्ध घर..…

  • या मोर्चा मधे

    या मोर्चा मधे

    या मोर्चा मधे इथं भांडण चाल्लीत, म्हणे ही सारी दलीत, पर मरणार माणुस.. या मोर्चा मधे!  .  . मरणारा मारणारा, जातीला तो सांगणारा, व्यर्थ ओरडणारा तूच, कोण उच्च कोण नीच, कोणी केसाला खेचील, कोणी देशाला विकिल, पोरका तूच होशील वेड्या.. या मोर्चा मुळे  .  . का दगड़ मारीला, कसा कागद फाडीला झाला जनावर तूच, खून…