१० गोष्टी यशवंत होण्यासाठी

 • टाईम पास करू नका

कुणी तरी म्हणून गेलंय ‘खाली दिमाग शैतान का घर’. कधीच रिकामं बसू नका. काहीही करा. पण रिकामं बसू नका!

 • सराव महत्वाचा आहे

एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा करायला घेता तेव्हा एक तर तुम्ही त्यात यशस्वी ठरता किंवा माती खाता. कामाचा रिजल्ट काही असुदे काम करत रहा.

 • पुढे चालत रहा!

चुकी झाली तरी चालेल, पण त्यातून शिका सुद्धा! पण एखादं काम बरोबर केलत तर त्यालाच पकडून बसू नका. ठीक आहे तुम्ही काय तरी मोठी गोष्ट जिंकली असेल, किंवा तुम्ही तुमच्या घराण्यातले पहिले डॉक्टर बनला आहात, किंवा पहिले इंजिनियर बनलात, याने तुमच्या ‘इगो’मध्ये भर पडायला देऊ नका. आपल्याला अजून मोठा ह्वायचंय!

 • बदलाला आपलंसं करा

‘बदल’ हि एकंच अशी गोष्ट आहे जी कधीच बदलणार नाही. बदलाला आपलंसं करून स्वतः बदलणारा खूप पुढे जातो. ‘परिस्थितीवर मात करणे’, ‘काळासोबत चालणे’ म्हणजे हेच कि!

 • सदा आनंदी

तुम्ही काम काहीही करा, कुठेही रहा, श्रीमंत बना किंवा गरीब रहा. तुमचा स्वभावच आनंदी राहण्याचा आहे तर तुम्ही सगळीकडे खूषच असणार. आणि रडणारे सतत रडतच राहणार. रडवी लोकं स्वादिष्ट जेवणात सुद्धा चुका काढतील, world tour ला सुद्धा नावं ठेवतील आणि सदा आनंदी राहणारी लोकं एखाद्या झाडाखाली बसून चटणी भाकरी सुद्धा पोटभर खातील.. अगदी आनंदाने! तुम्हाला ठरवायचंय कि तुमचा स्वभाव तुम्हाला कसा हवाय.

 • कारण इमानदारी डोळ्यात दिसते

इमानदारीत केलेली सगळी कामं जग मान्य करतं, तुमचं स्वागत होतं. तुम्हाला तुमच्या भावना सांगायला योग्य शब्द मिळाला नाही, आणि चुकून एखादा गैरअर्थाचा शब्द तोंडातून निघून गेलाच.. पण जर का तो शब्द प्रयोग करताना तुम्ही आतून इमानदार राहून ते बोलत असाल तरी समोरच्याला तुमच्या भावना समजून जातात. मग चुका देखील माफ होतात. इमानदार असाल तर तुम्ही सर्वगुणसंपन्न नसलात तरी चालून जातं. कारण इमानदारी डोळ्यात दिसते.

 • बघण्याचा नजरिया

अमुक-अमुक काम केल्यानेच यश मिळत असं काही नाहीय. चहा विकणारा माणूस पण खूप काही करून जातो. मागे एक वायरल बातमी आली होती कि एका चहावाल्याची मुंबईमध्ये ४-५ घरं आहेत!! इतकी तर एखाद्या सॉफ्टवेयर इंजिनियरची पण प्रॉपर्टी नसेल. मोठं व्हायचं असेल तर सुरुवात पण मोठीच असली पाहिजे असं नाही. प्रत्येक मोठी गोष्ट लहान गोष्टींमधूनच सुरु झालेली असते.

 • स्वतःच्या चांगल्या बाबींवर लक्ष असू द्या

यशस्वी होणं म्हणजे कधीच चुका न करण असं तर बिलकुल नाही. चुका कराव्यात. यशस्वी लोकं चुका करतात. पण त्यांचा फोकस चांगल्या बाबींवर असतो.

 • आत्मविश्वास

लोकांना तुम्ही बाहेरून कसे दिसता हे महत्वाच नाहीय. धाडसी असावं, जिद्दी असावं हे सगळं इतकं महत्वाचं नसेल कदाचित, पण तुम्ही एकांतात स्वतःला कसे बघता, स्वतःला किती कुवतीचे मानता, त्यावर तुमची उडी किती लांब जाणार हे ठरत असतं. स्वतःला तुम्ही जसे बघता, स्वतःशी स्वतः जसा संवाद साधता, तसेच इतर लोकं तुम्हाला वागवतात. कारण तुमची चाल-ढाल त्या प्रकारे इतरांशी बोलत असते.

 • हार मानायची का?

हातात एखादं काम घेतलं कि त्यात सो कॉल्ड जागतिक टक्केवारी नुसार किती लोकं यशस्वी होतात? मग मी त्यात मोडतो कि नाही. हे सगळं बाजूला ठेवायचं. तुम्हाला जे करायचंय ते करण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. चला लागा कामाला!

Related Posts

 • Reply राहुल पोवार June 27, 2018 at 3:55 pm

  खूप सुंदर थोड्यात आणि नेमकं सांगितलंय मस्त!👌👍

  • Reply admin June 30, 2018 at 6:18 pm

   खूप आभारी आहे पोवार भाऊ 🙂

  Leave a Reply