“दादर”

‘येथे कविता लिहून मिळतील’ कविता संग्रहात दुसऱ्यांसाठी मी बऱ्याच कविता लिहिल्या. पण ह्या कवितासंग्रहातली ‘दादर’ हि माझी सगळ्यात आवडती कविता… जी मी माझ्या स्वतःसाठी लिहिली होती. दादर मध्ये राहिलेल्या प्रत्येकाला हि कविता तितकीच भिडेल अशी आशा करतो..

 

“दादर”

माया मुंबईची

जणू काया आईची..

रंगीत साडीचा मखमली पदर..

दादर.. माझं अर्ध घर..

दंगलीने हादरलेली,

गर्दी घट्ट धरलेली,

अहोरात्र भार उचलत छातीवर,,

दादर.. माझं अर्ध घर..

दिवाळीच्या दिव्यांनी लखलखणारी,

मराठमोळी कोमल नारी,

जणू स्वर्ग अप्सरा नांदते जमिनीवर,

दादर.. माझं अर्ध घर..

मागेल ते ती लगेच देते,

पोटाची बुद्धीची भूक भागवते..

आहे एक अनोखं ज्ञानाचं आगर,

दादर.माझं अर्ध घर..

जपते सारे मराठी सेवक,

घडले येथे अनेक लेखक,

कवी, नाटककार, तेंडूलकर..

दादर.. माझं अर्ध घर..

माझं बालपण, माझं शहाणपण,

मला मिळालेली संस्काराची चादर..

दादर.. माझं अर्ध घर..

जरी असले ह्या भूमीला हजारो शाप,

घडवत राहील ही माता बापांचे बाप,

गरजेल मराठी इथूनच,

इथूनच उमटेल साऱ्याजगी मराठीची छाप..

येथे कविता लिहून मिळतील

‘येथे कविता लिहून मिळतील’ कवितासंग्रहामध्ये आणखीन खूप कविता आहेत ज्या तुम्हाला नक्की आवडतील.. कवितासंग्रह विकत घेण्यासाठी संपर्क करा: ‘आयडीअल बुक डेपो’, दादर (पश्चिम). तुमचे अभिप्राय जरूर कळवा. आणि हि कविता आवडली असेल तर दादर मधल्या प्रत्येक मित्राला नक्की ऐकवा.. कारण दादर खरच खूप ऑसम आहे !! 🙂

Related Posts

Leave a Reply